लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय ! शब्दांनी करतो प्रहार, धाडसी झुंजार, समाजसुधारणा निर्धार, विचारांत बळ शब्दांना धार, सुरक्षित समाजाचा शिल्पकार, झेप गरुडाची नजर सभोवार, असत्याचा करतो संहार, हाती लेखाणी तलवार. अशा या शब्दअलंकाराने लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची म्हणजेच पत्रकार या व्यक्तीमत्वाची व्याख्या तोंड भरुण केली तरी कमीच आहे असं मी नक्कीच म्हणणे. समाजासाठी हा सत्याचा आरसा समजला जातो. लोकांचा प्रचंड विश्वास असणारं प्रतिभावंत व प्रामाणिक उदाहरण म्हणून पत्रकारीतेकडं पाहिलं जातं. वृत्तपत्रविदया अवगत करण्यासाठी लेखणी तलावार व शब्दांची ढाल करुन अन्यायाच्या विरोधत लढण्यासाठी सज्ज असलेला पत्रकार. भल्याभल्यांना आपल्या शब्दांनी व परखड लेखणीच्या माध्यमातून चारीमुंडयाचित करणारा पत्रकार. पण हल्ली पत्रकरीता क्षेत्रामध्ये काही उणीवा जाणवू लागल्या आहेत. पत्रकारीतेला एक वेगळंच वळण लागलेलं पहावयास मिळत आहे. जनतेच्या मनात पत्रकारीतेबद्दल ज्या भावना होत्या त्या भावना बदलल्याचं कुठंतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जाणवत आहे. गेल्या काही वर्षापूर्वी पत्रकाराची जी छाप होती ती आज राहिली नसल्याचे भासू ...