बेरोजगारी इथली संपत नाही ...

बेरोजगारी इथली संपत नाही ... देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असून, बेरोजगारी सारखी मोठी समस्या युवकांच्या जणू पाचवीलाच पूजली आहे. येथील प्रशासन व सत्ताधारी आश्वासनांचे गाजर व कागदी घोडे नाचवण्याशिवाय काहीच करत नाही. दरवर्षी कित्येक डॉक्टर, इंजिनियर, पदवीधारक पदवी घेऊन रोजगार मिळवण्यासाठी बाहेर पडतात. परंतु शेवटी त्यांच्या हाती नैराश्याशिवाय काहीच मिळत नाही. खाजगी नोकरी असो व शासकीय नोकरी येथील रिक्त पदांच्या एका जागेसाठी दहा हजार अर्ज प्राप्त झालेले असे बरेच उदाहरणं आहेत. देशांमध्ये एवढी मोठी गंभीर समस्या असतांना, प्रशासन व सत्ताधारी हातावर हात ठेवून गप्प बसले आहेत. एकमेकांवर टिका करण्यात सत्तेतले पाच वेर्षे कसे निघून जातात यांचं यांनाच कळत नाही. बघ्यांची भूमिका घेऊन बसलेले सत्तेमध्ये येताना विरोधकांच्या नाकर्तेपणाचे भांडवल करून सत्तेवर येतात व शेवटी ‘जैसे थे’ असाच प्रकार घडत असल्यामुळे कित्येक तरुणांना रोजगार मिळत नाही त्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलले जात आहे. भारत महासत्तेची स्वप्न पाहतोय. भारत मंगळवार यान पाठवून तेथे शोध मोहीम सुरू करून वेगवेगळे शोध लावण्याचे स्वप्...