Posts

Showing posts from March, 2020

माकडांच्या हातात मोबाईलचं खोकडं …

Image
माकडांच्या हातात मोबाईलचं खोकडं … तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ! आता हे काय नवीन. पण तुम्ही जे वाचताय ना, ते खरंच आहे. जर माकडांच्या हातात मोबाईल दिला, तर ते माकड, त्या मोबाईलचं काय करेल ?  हे तुम्हाला सांगण्याची मुळीच गरज नाही. कारण माकड हा प्राणी. त्यामुळे मोबाईल चालवायचा कसा, याचे ज्ञान त्यास नसल्यामुळे तो त्या मोबाईलचे काहीही करेल, त्याला हवं तसं करेल. तसंच जगामध्ये सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातले असतांना. प्रत्येकजण आपला जीव वाचण्यासाठी प्रयत्न करतोय.  त्यात भर म्हणून अशीच काही माकडं आपल्या समाजामध्ये आहेत. जे समाजाची दिशाभूल करण्यासाठी सज्ज असून याच मोबाईलच्या खोकडयाचा वापर वाईट पध्दतीने करत आहेत. देशात काय परिस्थिती आहे. याचं गांभिर्य व भान असल्याचं या माकडांना मुळीच दिसून येत नाही. परिस्थितीचं गांभिर्य लक्षात आलं असंत तर यांनी असं केलं नसतं मुळीच. जीवावर बेतण्याची परिस्थीती निर्माण झाली असतांना व्हॉटसॲप, टिकटॉक, फेसबुक, इन्सटाग्राम, टेलीग्राम व इतर सोशल मिडयाचा वापर करुन काहीजण अफवा पसरवणे, चुकीच्या माहितीचा प्रसार व प्रचार करणे, एखादा संदेश समाजामध्ये तेढ निर्माण ...

जीवंत रहायचे असेल तर घरातच बसा; दीड जीबी वाल्यांनो उगाच वळवळ करु नका

Image
जीवंत रहायचे असेल तर घरातच बसा; दीड जीबी वाल्यांनो उगाच वळवळ करु नका. आपल्या देशातील नेटकर्‍यांनी कोरोना वर विनोद करण्याची हद्दच पार केली आहे. जणू काही यांच्या एकट्यावरच हे जागतिक संकट आलं आहे. यांच्या डोक्यात अजूनही विनोदाचे फवारे सोशल मिडीयावर सुरूच आहेत. कोरोना या व्हायरसमुळे जगामध्ये कित्येकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मात्र भारतामध्ये अजूनही या गंभीर व्हायरसला गांभिर्याने घ्यायला नेटकरी मुळीच तयार नाहीत. काही दीडशहाण्या दीडजीबी वाल्यांमुळे अफूची गोळी असलेल्या सोशल मिडीयावर बावळटांकडून उगाच नको त्या गोष्टींचा बाऊ होतांना दिसत आहे. यांनी कोरोना या व्हारसची गांभिर्याने दखल जर घेतली नाही तर येणार्‍या काळात शासनाला नक्कीच ठोस पावलं उचलावी लागतील. संचार बंदीच्या काळात नियमाचं पालन न करणे, उगाच घराबाहेर फेरफटका मारणे, विनाकरण गाड्या घराबाहेर नेउन मला कहीच होत नाही असा डायलॉग मारणे, अशा प्रकारचे विविध चाळे हे दीडशहाणी मंडळी करातंना दिसत आहे. माकडांच्या हातातल्या खोकड्यात दीड जीबी भरल्यामुळे हे अतिउत्साही माकडं उगाच वळवळ करतांना सोशल मिडीयावर पहावयास मिळत आहेत. शासन स्तरावर बेंबीच्या ...

हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीच ...

Image
हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीच ... संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे, हा व्हायरस आला कसा यावर चर्चा करण्यापेक्षा, आता प्रत्येकाला आपला जीव वाचवण्याची भ्रांत पडली आहे. या रोगाची सुरूवात चीन देशात झाली. वुहान शहरामध्ये या रोगाची सुरूवात झाली असून यामध्ये अनेकजण मृत्यूमुखी पडले. तसा तसा याचा प्रसार संपूर्ण जगामध्ये वार्‍याच्या वेगाप्रमाणे पसरतोय व अनेकांचे जीव घेतोय. जीव गेलेल्या व्यक्तीचा देह सुध्दा पाहणं, त्यावर अंत्यसंस्कार करणं याचं सुध्दा भाग्य त्या परिवाराला मिळत नाही. याचं कारण म्हणजे हा रोग संसर्गजन्य आहे. या महामारीमुळे संपुर्ण जगामध्ये कडेकोट बंद पाळण्यात येतोय. प्रत्येक देशामध्ये किडयामुंग्यांसारखे लोक मरत असल्यामुळे आपापल्या स्तरावर रुग्णांची काळजी घेतली जात आहे. प्रशासन आपापल्या स्तरावर नागरीकांची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेवून देशवासीयांच्या आरोग्याची काळजी घेत आहे व मिडीया व सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करत आहे. जेणे करुन मृत्यूदर कमी व्हावा. त्याप्रमाणे नैतिक जबाबदारी म्हणून आपणही आपापल्या पातळीवर प्रशासनाला सहकार्य करणे कर्तव्य आहे. आ...