गुरु, मित्र आणि प्रेरणास्थान – माननीय जगदीश एम. दळवी (जिल्हा न्यायाधीश)

गुरु, मित्र आणि प्रेरणास्थान माननीय जगदीश एम. दळवी (जिल्हा न्यायाधीश) एक गुरु, मित्र म्हणून माझ्या वकिलीच्या सुरुवातीला व आयुष्यातील अनेक टर्निंग पॉईंटसाठी साक्षीदार आणि मार्गदर्शक असलेले माननीय जिल्हा न्यायाधीश जगदीश एम. दळवी हे माझ्या जीवनातील एक विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे. लातूर येथे त्यांच्या सोबत काही वर्ष काम करण्याचा योग मला लाभला आणि हा माझ्यासाठी जीवन बदलणारा अनुभव ठरला. अनेक लोकांच्या आयुष्यात काही नाती अशी असतात जी योगायोगाने जुळतात, परंतु ती आयुष्यभर आपल्याला प्रेरणा देत राहतात. दळवी सरांची माझ्या जीवनातली भेट ही नेमकी तशीच आहे. त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणं ही केवळ एक नोकरी किंवा वकीलीतील टप्पा नव्हता, तर आयुष्यभर मार्गदर्शन करणारी शिदोरी मिळाल्यासारखं होतं. दळवी सरांना पुस्तक वाचनाची असलेली आवड म्हणजे त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग आहे. ते कोणताही विषय असो—साहित्य, कायदा, समाजशास्त्र, विज्ञान, राजकारण, अर्थव्यवस्था किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी—सर्वांबद्दल त्यांना सखोल ज्ञान आहे. गावपातळीवरील घटना असोत की आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी, ते त्याबद्दल ...