राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

राहुल जोगदंडचीयशोगाथाआनंदगाव ते दुबई जीवनप्रवास'
माय मराठीचा झेंडा सातासमुद्रापल्ल्याड
वृध्दापकाळात आपण म्हणतो की जीवनाचं सार्थक झालं. पण हेच सार्थक जर तारुण्यात झालं तर हा आनंद वेगळाचा अनुभवयाला मिळतो याच शंक्काच नाही. ही यशोगाथा आहे आनंदगावच्या राहुल शंकर जोगदंडची. आनंदगांव ते दुबई यशाची गुरूकिल्ली हस्तगत करण्याची कला राहुल यांनी जीवनात येऊन कशा प्रकारे खडतर प्रवास करुन मिळवली त्याचाच आपण या ठिकाणी थोडसं विषयांतर करुन काही जीवनात घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आपणासमोर मांडण्याचा इवलास प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. आज काल दुबई म्हणजे भारतात या राज्यातून त्या राज्यात जाणं जेवढं सोपं आहे त्या पेक्षाही तंत्रज्ञान विकसीत झाल्याने डीजीटल टेक्नॉलॉजीमुळे अगदी सोपच होऊन गेलं आहे. आजकाल दुबईला जाणं ही काही नवलाईची गोष्टी नाही किंवा यात काही प्रत्येकासाठी नाविन्यच उरलेलं नाही असं भासू लागलं तर आहेच, पण प्रत्यक्षदर्शी परिस्थितीही निर्माण झाली आहे. गरिबी परिस्थतीतुन शिकुन किंवा नेहमीच दुष्काळाच्या कचाटयात सापडणारा मराठवाडा यामुळे अशा ठिकाणी राहून सातासमुद्रापल्ल्याड जाणं जणू कठीणच काम, आणि त्यात आई वडील आडाणी असतील तर मग याच कठीण कामास आणिखी कठीण होण्यात भर पडते यात शंक्काच नाही. पण यावर मात करुन मौजे आनंदगांवचे राहुल जोगदंड यांनी आपल्या जीवनातला खडतर प्रवास संपवुन बीड जिल्याचे नाव परदेशात गाजवले आहे. सोबतच महाराष्ट्राच्या मातीचा मानाचा तुरा महाराष्ट्रासारख्या महान राष्ट्राची मान उंचावली आहे. माय मराठीचा झेंडा सातासमुद्रापल्ल्याड रोऊन मराठीचा मान राखण्यात राहुल यांना सिंहाचा वाटा मिळाला आहे.
राहूल हे मध्यमवर्गी कुटूंबातूनच शिकले, त्यांची परिस्थिती अतिशय बिकट अशी होती, इयत्ता दहावीचे शिक्षण त्यांनी पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक विदयालय सारणी आनंदगांव या शाळेतूनच पूर्ण केले. राहुल यांची घरची परिस्थिती त्या काळी एवढी बिकट होती की, त्यांना इयत्ता दहावीचे परिक्षा शुल्क दहावीच्या बोर्डाकडे भरण्याची कुवतच नव्हती, अशाच संकटांना तोड देत त्यांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण केली.  दहावी नंतर त्यांनी पुढील आवश्यक ते शिक्षण घेतले, त्यानंतर शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात एका नावलौकीत संस्थेमध्ये त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट (व्यवस्थापन) डिप्लोमा पूर्ण केला. त्याचं नाव आहे प्रिया इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, पुणे, त्यानंतर त्यांनी पुढील निर्णय परदेशाती नौकरी करण्याचे ठरवले, हे ठरवणे खुप सोपे काम होते मात्र हे प्रत्यक्षात कृतीमय चित्र साकार करणे फार अवघड बाब होती. ज्याच्या अंगी जिद्द असते तोच जिवनात यशस्वी होतो याप्रमाने राहुल यांनी परदेशात नौकरी करुन आपले आपल्या आई वडीलांचे गरिबीतून वर येऊन सुखात जगण्याचे स्वत:चे जीवनात येऊन काही तरी इतरांपेक्षा वेगळं असं करावं असं ठाम केलं.  ही उर्मी मनात त्यांच्या त्यांना शांत बसू देत नव्हती म्हणून हे त्यांचे हेच जीवनातले परम स्वप्न ध्येय्य बनले. हे ध्येय्य जर राहुल यांनी त्या वेळी मनाशी एकजूट होऊन ठरवले नसते तर ते जीवनात काहीच करु शकले नसते असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या राहुल जोगदंड दुबई येथे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये परमनंट जॉब हस्तगत केला आहे. देवाला त्यांनी प्रार्थना केली की मला तु माझ्या देशातून परदेशात पाठवुन माझ्या महाराष्ट्राच्या मातीचे माय मराठीचे नाव झळकवण्याची संधी मिळवून दिलीस त्याबद्दल मी तुझा शतश: आभारी आहे.
राहुल यांनी पुणे येथून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी प्रिया इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटींग टेक्नॉलॉज पुणे 2008 ला मिळवली. ही त्यांच्या आयुष्यातली यशाची पहिली पायरी होती. ज्यांनी आपल्या आयुष्याची सुरूवात एका छोटयाशा खेडे गावांत केली त्यांनी आतोनात बिकट परिस्थितीशी  सामना करत, जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटांना सुखा सारखी वागणूक देऊन मात करत पुढे चालत राहिले. थकले असते, आत्मविश्वास गामावून बसले असते, प्रत्येक गोष्टीत खचून गेले असते तर मात्र यशाची गुरूकिल्ली मिळवणं त्यांचं अख्खं आयुष्य गेलं असतं तरी सुध्दा त्यांना याची संधी सुध्दा मिळणं हे अवघड झालं असतं. याउलट त्यांनी त्यांची ही परिस्थितीशी झुंज कायम ठेऊन मनाशी जिद्द ठेवली, निश्चय केला म्हणून आज आनंदगांव या छोटयाशा गावाचे नाव सातासमुद्रापल्ल्याड मानाचा तुरा डोक्यावर लावून उंच मान ठेऊन हसत मुखाने डोलत आहे. ही या गावचीच नव्हे तर बीड जिल्याची आणि महाराष्ट्र राज्यासाठी प्रशंसनीय बाबच होय. राहुल जोगदंड यांच्या पुढील कार्यासाठी सबंध महाराष्ट्र त्यांची नेहमी पाठीशी राहिल त्यांचा अंबाजोगाईतल्या निर्मळ स्वभावांच्या  लोकांशी प्रेमाची नाळ जोडलेली असल्याने त्यांना खास अंबाजोगाईतील बांधवांचे नेहमीच आकर्षन असते यात शंकाच नाही. याचे कारण म्हणजे अंबाजोगाई शहरातील जीवनात भेटलेल्या सर्व आप्तेष्ठानी राहूल यांना प्रेमाने वागणूक देऊन, मान सन्मान देऊन, आपुलकीच्या भावनेने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतीचा हात त्यांच्या डोक्यावरुन फिरवत राहिले, यामुळे राहुल हे अंबाजोगाईतील सर्व मित्रपरिवाराची सऱ्हदय आयुष्यभर ऋणी असतील हे त्यांनी व्यक्त केले आहे

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422
hr.shankarchavan@gmail.com

Comments

Popular posts from this blog

गुरु, मित्र आणि प्रेरणास्थान – माननीय जगदीश एम. दळवी (जिल्हा न्यायाधीश)

हजारो आत्महत्याग्रस्त बापांच्या लेकींच्या लग्नात आनंदाचे रंग भरणारा ‘फोटोग्राफर देवदूत’ – वैभव आखाडे

ॲड. शंकर चव्हाण परिवर्तनवादी नेतृत्व