स्वप्नं विदेशात जाण्याचं !

स्वप्नं विदेशात जाण्याचं !

पदवी शिक्षण पूर्ण झाले की युवक नौकरीच्या शोधात असतो, पदवी शिक्षण पूर्ण होता न होता त्याआधीच नौकरी कोठे व कशी मिळवावी याचं प्लॅनिंग तरुण वर्गामध्ये मित्रमैत्रिणींच्या सहवासातून, चर्चासत्रातून चालू असतं. आपल्या भारत देशातील चलन रुपयांमध्ये आहे. त्यापेक्षा विदेशी चलन त्याप्रमाणात आपल्या रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे व विदेशातील महिन्याला मिळाणारा पगार थोडा वाटता तर त्याचं रुपांतर भारतात आल्यानंतर किती तरी पटीने जास्त असल्यामुळे हे पहिलं ं कारण विदेशात जाण्याचं असावं असं तरुणांच्या उत्सुकतेकडं पाहून वाटतं. भारत देश हा गरीब देश असल्यामुळे तरुणांना गरीबीतून शिक्षण घेतल्यामुळे गरीबीची जाण असते. त्यामुळे घरची परिस्थिती बदलण्यासाठी व स्वत: जीवनात काय करायचं अशी विविध स्वप्न बघितल्यामुळे तरुण युवक वर्ग हा नेहमीच स्पर्धेत टिकूण राहण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र सर्वांनाच विदेशात जाण्याची संधी मिळत नाही. भारतातील बऱ्याच तरुणाईमध्ये इंग्रजीचा पाया पक्का नसल्याने व आत्मविश्वास नसल्याने एक प्रकारचे न्यूनगंड तयार झाले आहे. त्यामुळे त्याचा बराचसा फटका त्यांना करिअर करतांना बसतो. शिवाय यासर्व प्रकरणाला गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची, मार्गदर्शन मिळते पण ते जेंव्हा हवे असते तेंव्हा मिळत नाही, जेंव्हा मिळते तेंव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. देशात बरीच सल्ला केंद्र कार्यरत आहेत, पण त्यांच्या असणाऱ्या अवाढव्य शुल्कामुळे बरीच युवा तरुण पिढी विदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण करु शकत नाही. या सर्व कारणांमुळे विदेशात जाण्याचं स्वप्नं हे स्वप्नंच राहतं. त्यामुळे आयुष्यभर विदेशात जाण्याचं स्वप्नं पाहण्याऱ्यांना विनंती की योग्य वेळी योग्य सल्ला, मार्गदर्शन घ्या व आपली विदेशात जाण्याची स्वप्नं पूर्ण करा.

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

Popular posts from this blog

गुरु, मित्र आणि प्रेरणास्थान – माननीय जगदीश एम. दळवी (जिल्हा न्यायाधीश)

हजारो आत्महत्याग्रस्त बापांच्या लेकींच्या लग्नात आनंदाचे रंग भरणारा ‘फोटोग्राफर देवदूत’ – वैभव आखाडे

ॲड. शंकर चव्हाण परिवर्तनवादी नेतृत्व