कोस कोस चालतो वारकरी अन विठ्ठलाचे पहिले दर्शन घेतात मुख्यमंत्री ?


कोस कोस चालतो वारकरी
अन विठ्ठलाचे पहिले दर्शन घेतात मुख्यमंत्री ?

विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक राज्यातून परराज्यातून पायी पंढरपूरकडे जाण्यासाठी कोस कोस दूर पल्ले पार करुन दर्शन घेतो. पंढरपूरला आषाढी एकादशी दिवशी दर्शन मिळावे यासाठी प्रत्येक वारकऱ्याची धडपड पहावयास मिळते. प्रत्येक भाविकाला, प्रत्येक पायी दिंडीमध्ये चालत जावून पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या वारकऱ्याला वाटतं कानडा विठ्ठल माझ्याकडेच पाहतोय. विठ्ठलाचा महिमा सांगत, विठ्ठल विठ्ठल, माउली माउली, टाळ, विणा, मृदंगाच्या गजरात पायी दींडीचे चित्र पहावयास मिळते. दिंडी शहरातून जात असतांना दिंडीकडे नकळत कान गेल्यास विठुरायाचा गजर ऐकू आल्यास अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. इतके आपणही तल्लीन होतो, ना कोणाती जात ना कोणाता भेद, विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी एकमेव जात असते, एकमेव माणुसकी, एकमेव भाव म्हणजे माउली, एकमेकांना हाक मारतांना सुध्दा नावाने हाक न मारता फ क्त माउली म्हणतात, मग स्त्री, पुरूष किंवा चिमुकली असोत. वारकऱ्यांच्या पालखीमध्ये सर्वस्तरातील, सर्व वयोगटातील माउली असतो, उन, वारा, पावसाची तमा न बाळगता विठुरायाच्या दर्शनाची ओढ विठुरायाच्या भक्ताला लागलेली असते. 

हे पवित्र दर्शन घेतांना तन, मन व वातावरण अगदी माउली माउली होवून जातं. पंढरपूरमध्ये करोडो भाविक येतात, त्यांच्या सुरक्षेसाठी भारतीय आर्मी, पोलीस, जवान तैनात असतात, कोणात्याही वारकऱ्याला दगा किंवा त्रास होता कामानये, दर्शन घेण्यासाठी तब्बल दोन दोन दिवस लागतात पण विठुरायाचे चरणी नतमस्तक व लीन होवूनच वारकरी हा आपला श्वास टाकतो. ही झाली पांडुरंगाची भक्ती. गेली कित्येक पिढया ही चाललेली भारतीय परंपरा आहे, दरवर्षी न चुकता नित्य वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भक्त मंडळीला मात्र हजारो कोस चाललं तरी दर्शन घेण्यासाठी रांगेतच उभे रहावे लागते. कारण माउली हा प्रत्येक सारखाच असतो. मग आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हेलीकॉप्टरने येवून दर्शन पहिल्यांदा घेतात किंवा त्यांचा मान असतो वगैरे वगैरे असं दरवर्षी पाहतो पण असं का ? याचा विचार कधी केलाय का आपण, विठुरायाचा भक्त हा प्रत्येक जण सारखाच आहे, कोसो दूर चालून येणारा वारकरी विठुरायाचा खरा भक्त वारकरी मग मुख्यमंत्री पहिल्यांदा दर्शन का घेतात असा इवलासा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय रहात नाही. 

मनामध्ये शंका नसून हा भेद का ? व कशासाठी ? याचा तिढा काही सुटलेला नाही. मला तर वाटते यंदा मुख्यमंत्री यांनी हा तिढा सोडवण्यासाठी ठोस पाउल उचलावे तेवढं जमेल तेवढ माउली होवून वारीमध्ये पायी विठ्ठलाच्या दर्शनाला यावे त्यानिमित्ता पांडुरंगाच्या कृपेने पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते. विठ्ठलाच्या दर्शनाचा पहिला मान हा वारकऱ्यांनाच मिळाला पाहिजे. इतर कोणालाही नाही, कारण कोसो दूर वारकरी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी कशाचीही तमा न बाळगता, कुटूंबाला महिना दोन महिने एकटं टाकून दर्शनासाठी येतो. हे कुठं तरी थांबलं पाहिजे असं पुरोगामी   विचारधारेच्या महाराष्ट्रातील जनतेला वाटत आहे.


शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422,
hr.shankarchavan@gmail.com

Comments

Popular posts from this blog

गुरु, मित्र आणि प्रेरणास्थान – माननीय जगदीश एम. दळवी (जिल्हा न्यायाधीश)

हजारो आत्महत्याग्रस्त बापांच्या लेकींच्या लग्नात आनंदाचे रंग भरणारा ‘फोटोग्राफर देवदूत’ – वैभव आखाडे

ॲड. शंकर चव्हाण परिवर्तनवादी नेतृत्व