सावधान ! आपली मुलं सैराट तर होत नाहीत ना !



सावधान ! आपली मुलं सैराट तर होत नाहीत ना !

धावपळीच्या जीवनात व स्पधेर्र्च्या युगात टिकूण राहण्यासाठी पालकांना अतिशय कष्टयातनेतून आपला उदरनिर्वाह करावा लागतो. पाल्यांच्या शिक्षणासाठी पैसाच लागतो म्हणून पोटाला मारुन तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे चालू असतांनाच हल्लीची तरुन पिढी पार बिघडून वाया चाललेली दिसून येत आहे, आपली संस्कृती, पालकांचे संस्कार, वडीलधाऱ्यांचा मान राखणे जणू हे सर्व विसरुनच गेले आहेत असंच वाटतं. कधी कधी तर समोरुन येणारा मुलगा आहे की, मुलगी हे ओळखणंच फार कठीण झालं आहे. त्याचं कारण म्हणजे आजकालची फॅशन, अंगप्रदर्शन वगैरे वगैरे. राहणीमाना सोबतच वागण्यातही मोठा परिणाम झालेला दिसतो. कधी काळी महिला वर्गाला चूल आणि मूल यापुढे काहीही करु दिलं जात नव्हतं. मात्र लोकशाही राज्यात स्वातंत्र्याचा एवढाही दुरूपयोग कधी कुठं झाला असेल तर तो फक्त भारतातच. स्वातंत्र्य असावं, याला विरोध नाही पण स्त्री वर्गाने व पुरूष वर्गाने त्याचा वापर चांगल्या कामासाठी केला तर स्वत:साठी व देशहीतासाठी व आपल्या पालकांसाठी वरदान ठरेल. गेल्या काही वर्षांपासून अल्पवयीन प्रेमप्रकरणे, घरातून पळून जाणे, त्यातून निर्माण होणारे दुष्परीणाम, आत्महत्या, द्वेशातून खून, बलात्काराला बळी पडणे, मारझोड अशा प्रकारे व अशा वार्ता सहचज कानी पडत असतांना, त्यात आणखी एक फॅड म्हणजे दूरचित्रवाणी, सिनेमा इंटरनेट यांच्यामुळे काही वाईट परिणामही दिसून आहे. हल्ली प्रेमी युगल अल्पवयीन, इतर वयोगटातील व इतर नातेसंबंधातील असोत पळून जाण्यात सराईत झाले आहेत. आजकाल मुला मुलींना सोशल मिडीया व इंटरनेटच्या सहाय्याने शालेय जीवनापासूनच एकमेकांबद्दल असेले फक्त आकर्षनामुळे संवाद साधने सोपे झाले आहे. त्याचा परिणाम हा अशा वाईट शेवटाने होतो. एकदा का मोबाईल हातात पडला की मग झालेच. याकडे धकाधकीच्या  जीवनात मग्न असलेल्या पालकांना आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्यामुळे असे प्रकार घडत असावेत असे  निरीक्षणावरुन लक्षात येते. पालकांनी जर याकडे वेळीच लक्ष दिले तर असे प्रकार होणार नाहीत. पाल्यांशी वेळोवेळी संवाद साधला, त्यांच्याशी मैत्रीच्या नात्याने चर्चा केली तर अशा गोष्टींना जे की, अल्पवयीन सैराट प्रेमींना आळा बसेल. पालकांच्या दुर्लक्षीतपणामुळेच अशा गोष्टींना खतपाणी मीळते. शाळा, कॉलेजं, खाजगी क्लासेस या ठिकाणीही मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतो. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे, चिडीमार पथकाचेही दुर्लक्ष असते. एखादी घटना घडल्यास त्यावर उपाययोजना करुन काहीही उपयोग होत नाही. सैराट प्रेमी पळून जाऊ नये यासाठी पालकांनी दक्ष असायला हवे व वेळीच यामुळे होणाऱ्या दुर्घटनांना आवर घातला पाहिजे. त्यामुळे लक्ष असू दया पालकांनो सावधान ! आपली मुलं सैराट त होत नाहीत ना !


शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

Popular posts from this blog

गुरु, मित्र आणि प्रेरणास्थान – माननीय जगदीश एम. दळवी (जिल्हा न्यायाधीश)

हजारो आत्महत्याग्रस्त बापांच्या लेकींच्या लग्नात आनंदाचे रंग भरणारा ‘फोटोग्राफर देवदूत’ – वैभव आखाडे

ॲड. शंकर चव्हाण परिवर्तनवादी नेतृत्व