अन् पुन्हा एकदा ‘ती’ नकोशी झाली …

अन् पुन्हा एकदा ‘ती’ नकोशी झाली …
ज्याच्याकडं आई नाही त्याच्याकडं काहीच नाही, ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर. एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आई हा शब्द जीवंत व्यक्तींच्या भावनाशी निगडीत असा शब्द आहे. त्यामुळे आईला जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते. ज्याच्याकडे आई नाही त्याला जाऊन विचारा आईची किंमत काय असते. मातृत्व ज्या स्त्रीला मिळाले तीला जाऊन विचारा मातृत्व स्विकारल्यानंतर त्यात तिला कसले समाधान वाटते. मराठीतील प्रसिद्ध कवी यशवंत यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " ही ओळ लिहून आई या शब्दाची व्याख्या जगासमोर मांडली आहे, परंतू ही मातृत्वाची जाणीव एकीकडे व महाराष्ट्रातील बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. कारण, इथं मातृत्वाला काळीमा फासणारी या महिन्यातील दुसरी घटना घडली, चक्क आईने जिच्या विना जीवनाची सुरूवातच होत नाही, अशा एक वैरीणीने आपल्या दोन दिवसाच्या स्त्री अर्भकाला बाभळीच्या काटयाच्या आळयामध्ये टाकून दिले. अरे ! हे काय ऐकतोय ? असा प्रकार ऐकायला सुध्दा किती हे भयानक वाटतो. पण हे खरं आहे. बीड जिल्यात यापूर्वीही स्त्री अर्भकांच्या गर्भपात प्रकरणामुळे परळी तालुका सर्व देशभरामध्ये परिचित आहेच. तेव्हापासूनच मुलगी वाचवा हे अभियान जनजागृती म्हणून सुरू झाले. मुलगी वाचली पाहिजे, तिला पोटातच मारु नका, तीचा काय गुन्हा, ती मुलगी आहे हा तीचा गुन्हा आहे का, तीची पोटातच हत्या का करता,  मुलगी शिकली पाहिजे, हे सर्व फक्त बोलायला ? कुशाग्र बुध्दीमत्ता असलेल्या, संवेदना असणाऱ्या मानवी मनाला पटतंय का हे ? अरेरे ! काय हे बीड जिल्हयाचे दुर्देव ? एक दुर्देवी माता एका बाळाला जन्म देते, ते दोन दिवसाचं बाळ स्त्री असल्याचे समजताच त्या अर्भकाला काटेरी आळयामध्ये फेकून देते, अशी घटना ऐकल्यास काळजाला चर्रर्रर्र् झालं. सर्वत्र स्मशान शांतता, हे ऐकून मन अगदी सुन्नच झाले. वंशाचा दिवा मुलगा पाहिजे म्हणून मुलीची गर्भातच हत्या होत असल्यामुळे अगोदरच मुलींचा मृत्यूदर वाढत आहे. स्त्री ही गर्भातच सुरक्षीत नाही तर बाहेर या विश्वामध्ये तीच्या सुरक्षेचं काय ? “ती” च्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. ती कोणाची तरी आई असते, कोणाची बहिण, कोणाची मैत्रीण तर कोणाची पत्नी. एवढी सर्व नाते ती जपते तर तीचा खून करण्याचे धाडस कसं काय माणूस करु शकतो ? हा गंभीर व चिंतेचा विषय आहे. एवढी का नकोशी झाली ती ? माणूसकीला व मातृत्वाला काळीमा फासणारा हा प्रकार बीड जिल्हयात घडला, त्या दोन दिवसापूर्वी जन्मलेल्या त्या स्त्री अर्भकाला काटेरी आळयात टाकले असता, त्याच गावातील गावकऱ्यांनी तील तेथून तिची सुटका केली, एका मातेने तीचे अंग पुसुन घेतेले व एका मातेने त्या स्त्री अर्भकाला दुध पाजवले व जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले, ही असते माय माऊलीची ती माया जी जगाच्या पाठीवर कुठेच मिळत नाही आणि दुसरीकडे एक वैरीण तीला असं टाकून गेली, तीची हिम्मत तरी कशी झाली ? तीला हे कृत्य करतांना लाज कशी वाटली नाही ? ते बाळ जगलं, मोठं झालं तीला जग समजायला लागलं तर तीने काय म्हणून या जगात वावरायचं ? इतरांप्रमाणे तीचे आई बाबा कुठे म्हटल्यावर समाजाकडेसुध्दा याचे उत्तर नसणार आहे. ‘ती’ चे केवढे हे दुर्देव !. अजुनही असे कित्येक प्रकार दिवसेंदिवस घडत आहेत. जे की अंधारातच आहेत. स्त्री अर्भक असल्याचे कळताच तीचा गर्भामध्येच खून होतो,  ही खरोखरंच खूपच गंभीर बाब आहे, अशा घटना कानावर पडताच जीव अगदी कासावीस होतो. शेवटी मन असणारे अशा गोष्टी ऐकल्यास निशब्द होतो. ज्याला प्रेम नाही, दया माया नाही त्यांना असे पाप केल्याचे काहीच वाटणार नाही, कारण ते माणूस नसून राक्षसी प्रवृत्तीचे असतात. असे कृत्य करणाऱ्या वैरीणींना पकडून कठोरात कठोर शिक्षा व्हायलायच पाहिजे. तेंव्हा कुठे असे क्रुर कृत्य करण्याचे धाडस कोणतीच स्त्री करणार नाही व अशा प्रकारांना आळा बसेल.
-  शंकर चव्हाण, अंबाजोगाई, 9921042422

Comments

  1. त्या परिसरात बोटावर मोजण्या इतकेच बाळ जन्माला घालणारे दवाखाने असतील तेथील रेकॉर्ड तपासून ज्यांना मुलगी झाली त्यांना भेटायला पाहिजे
    मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गुरु, मित्र आणि प्रेरणास्थान – माननीय जगदीश एम. दळवी (जिल्हा न्यायाधीश)

हजारो आत्महत्याग्रस्त बापांच्या लेकींच्या लग्नात आनंदाचे रंग भरणारा ‘फोटोग्राफर देवदूत’ – वैभव आखाडे

ॲड. शंकर चव्हाण परिवर्तनवादी नेतृत्व