वाचकांच्या शोधात ...


भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे संपूर्ण देश डिजीटल झाला. आता माहितीची देवाणघेवाण करणं अगदी काही सेकंदामध्ये पूर्ण होत असल्याने ही मोठी अभिमानाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये मोठया प्रमाणात अमुलाग्र बदल होतांना दिसत आहे. विज्ञानाची कास धरुन डिजीटल क्षेत्रात मोठी क्रांती झाली. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या पूर्वीपासूनच चहासोबत वर्तमानपत्र वाचण्याची चांगली सवय भारतीयांना आहे. सकाळी वर्तमानपत्र वाचणे हा दिनक्रम आजही अनेकांचा आहे. परंतू हातामध्ये स्मार्टफोन आल्यामुळे आजच्या पिढीला वाचण्याची आवड व सवड या दोन्ही गोष्टींचा लोप पावल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. फक्त दृक-श्राव्य माध्यमांचा अधिक वापर होऊ लागल्यामुळे वाचनाची सवय मोडली आहे. पुस्तकं माणसाला हुशार बनवतात. वाचन केल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते व वाचन केलेली व्यक्ती ही विचारांनी श्रेष्ठ असते. वाचाल तरच वाचाल, पुस्तकांमुळं माणसाचं मस्तक सशक्त होतं आणि सशक्त झालेलं मस्तक कधीही कोणासमोर नतमस्तक होत नसतं असं म्हणतात. पण तरुणाई व्हीडीओ रिलच्या नादी लागल्याने त्यांचा व वाचनाचा संपर्क कायमचा तुटला आहे. वाचन प्रेरणा मिळावी यासाठी तरुणाईवर पालकांनी संस्कार करावे हा एकमात्र सक्षम पर्याय असू शकतो परंतू हल्ली पालकांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे मुलांना संस्कार करण्यासाठी पालकांकडे वेळच नाही. त्यांना स्वत:ला वाचन करण्यासाठी वेळ नाही तर त्यात पाल्यांना वाचनाची आवड निर्माण कशी होणार. आपली मुलं आपल्याकडं पाहून अनेक गोष्टींचे अनुकरण करत असतात. त्यांच्यासाठी प्रथम गुरू ही आई असते व आपली मुलं आपल्या पालकांकडे एक महत्वपूर्ण दृष्टीने पाहतात. आई वडील हे मुलांसाठी रोल मॉडेल असतात. जसं पालक तसेच त्यांचे पाल्य आपल्य आयुष्याला आकार देतात. त्यामुळं भविष्यकाळात पुढची पिढी वैचारिक व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच सर्व पालकांनी एक महत्वपूर्ण निर्णय आजच घ्यायला हवा तो म्हणजे आपल्या पाल्यांवर वाचन संस्कार झाले पाहिजेत. वाचन संस्कार म्हणजे सक्तीचे नव्हे, ज्यांना ज्या प्रकारच्या साहित्याची, वाचनाची आवड आहे त्याच प्रकारची पुस्तकं व वाचन साहित्य त्यांना उपलब्ध करुन दयावेत. दिवसातून किमान एक तास तरी वाचन केले पाहिजे. स्पर्धापरिक्षा देणार्‍यांनी सुध्दा दिवसातून अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्य वाचण्यासाठी वेळ दिला पाहिजे त्यामुळे नक्कीच त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. कॉपी पेस्टच्या प्रकारांमुळे तेच तेच सोशल मिडीयावरील पोस्ट पाहून अगदी वीट आला आहे. सोशल मिडीमधील काही अ‍ॅप उघडण्यासाठी सुध्दा आता कंटाळा येत आहे. ग्रुपची वाढती संख्या पाहून प्रलंबित मेसेजची संख्या हजारांहून अधिक असल्यामुळे महत्वाच्या पोस्ट वाचणं सुध्दा कठीण होऊन गेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर डिजीटल तंत्रज्ञानाच्या दुनियेत ई-कचरा मोठया प्रमाणात वाढला आहे.   वर्तमानपत्रांच्या वाढीव संख्येत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. प्रिंट मिडीयाच्या क्षेत्राला पूर्वीसारखे दिवस नाहीत कारण डिजीटल तंत्रज्ञानाचा उदय झाला व प्रिंटी मिडीयाला वाचकांनी बगल दिली. परंतू प्रिंट मिडीयाची विश्वासार्हत आजही कायम टिकून आहे यात शंक्काच नाही. फक्त सकाळच्या चहासोबत वर्तमानपत्र वाचण्यासाठी प्रिंटी मिडीया  वाचकांच्या शोधात आहे हे मात्र नक्कीच. हे जेव्हा शक्य होईल तेंव्हा त्याचा परिणाम वैचारिक पिढीच तयार होईल असा विश्वास वाटतो. ते फक्त पालकांच्या हातात आहे. 

-   शंकर चव्हाण (महाराष्ट्र राज्य) 9921042422

***

Comments

Popular posts from this blog

गुरु, मित्र आणि प्रेरणास्थान – माननीय जगदीश एम. दळवी (जिल्हा न्यायाधीश)

हजारो आत्महत्याग्रस्त बापांच्या लेकींच्या लग्नात आनंदाचे रंग भरणारा ‘फोटोग्राफर देवदूत’ – वैभव आखाडे

ॲड. शंकर चव्हाण परिवर्तनवादी नेतृत्व