खूप चांगली पुस्तकं वाचा ...




तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल तर तुमच्याजवळ विचार असायला हवेत. केवळ विचार असुन चालत नाही तर ते चांगले विचार असायला हवेत म्हणून केवळ चांगले विचार चांगली पुस्तकंच देवू शकतात. त्यामुळं अजूनही वेळ गेलेली नाही आयुष्यात खूप चांगली पुस्तकं वाचा. वाचन केल्यानं विचार सशक्त होतात व कसल्याही संकटावर मात करण्यासाठी पुस्तकांचा आधार मोलाचा ठरतो. आपल्या देशाला एक वरदान असं आहे की, आपल्या देशात खुप थोर विचारवंत आहेत त्यांनी लिहिलेले साहित्य दर्जेदार असून त्यांनी त्यांचा त्यामध्ये अनुभव रेखाटन केला आहे. तुम्हाला नक्कीच तुमच्या  जीवनात त्यांनी लिहिलेल्या दर्जेदार साहित्याचा अस्वाद घेता तर येईलच शिवाय जीवनाच्या वाटेलवर काटेरुपी येणार्‍या संकटांवर मात देखील करता येईल. चांगली पुस्तकं चांगली माणसं घडवतात. व्यक्तीमधील राग, द्वेष, मत्सर याचे प्रमाण लोप पावते. चांगली पुस्तकं चांगली पिढी घडवण्यासाठी मदत करतात. चांगली पुस्तकं जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देतात. क्षेत्र कोणतंही असो अभ्यास महत्वाचा असतो. अभ्यास कोणाता योग्य तेही पुस्तकांच्या माध्यमातून समजते. इतिहास वाचल्याशिवाय भाविष्याच्या अंधारात चालणं खूपच कठीण आहे. महापुरुषांच्या विचारांचे, त्यांनी दिलेल्या प्रेरणेतूत आपण अनेक गोष्टी शिकलं पाहिजे. जीवन एकदाच आहे याची वारंवार जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे. त्यामुळे आपण आयुष्याच्या कुठल्या   वळणावर आहोत याची जाणीव नक्कीच होते. चांगल्या पुस्तकांच्या माध्यमातून   वाचनाची गोडी निर्माण होते. ज्याला जे साहित्य आवडते ते नियमित वाचले पाहिजे, वर्तमानपत्राचा दैनंदिन जीवनात खूप मोठा सहभाग असायला हवा.  दिवसाची सुरूवात वर्तमानपत्र वाचल्याशिवाय घराच्या बाहेर कोणीही पडलं नाही पाहिजे असं समीकरण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत वैचारिक पिढीचा उदय इथं होणार नाही. शेवटी चांगले विचार हे चांगल्या पुस्तकातूनच मिळतात.

- शंकर चव्हाण (महाराष्ट्र राज्य) 9921042422

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गुरु, मित्र आणि प्रेरणास्थान – माननीय जगदीश एम. दळवी (जिल्हा न्यायाधीश)

हजारो आत्महत्याग्रस्त बापांच्या लेकींच्या लग्नात आनंदाचे रंग भरणारा ‘फोटोग्राफर देवदूत’ – वैभव आखाडे

ॲड. शंकर चव्हाण परिवर्तनवादी नेतृत्व